Lek Ladki Yojana Maharashtra 2023/ लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजनेला मंजुरी


 राज्य मंत्रिमंडळाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या लेक लाडकी योजनेला मंजुरी दिली. यासोबतच राज्य सरकारच्या 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला.

> नवरात्रीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्म लेल्या मुलींना 1,01,000 रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली होती.

> या योजनेंतर्गत मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत गरीब कुटुंबाला हप्त्याने पैसे दिले जाणार आहेत. -

> योजनेची उद्दिष्टे :

> मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे,

> मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

> मुलींचा मृत्यूदर, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे.

 > कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.

> या योजनेंतर्गत महाराष्ट्रात मुगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला 5 हजार रुपये दिले जातील. तसेच मुलगी पहिलीच्या वर्गात पोहोचल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, मुलगी 11 वीत पोहोचल्यावर 8000 रुपये आणि 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये कुटुंबाला दिले जातील. अशा प्रकारे, मुलीच्या जन्मापासून ती प्रौढ होईपर्यंत कुटुंबाला 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत.

लाभार्थी :

> लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

> पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील.

> पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

> दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण, त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.

> अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

>  1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही लाभ मिळेल.


लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 आवश्यक कागदपत्रे :-

>पिवळा किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
>मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
>आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो
>अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
>पत्त्याचा पुरावा
>उत्पन्नाचे प्रमाणपत्र
>मोबाईल नंबर
>ई - मेल आयडी
>बँक पासबुक

रक्कम खाली दिलेल्या चरणांमध्ये उपलब्ध असेल :-

1.मुलीच्या जन्मानंतर5000/- रुपए
2.शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर6000/- रुपए
3.सहाव्या वर्गात गेल्यावर7000/- रुपए
4.अकरावीत आल्यावर8000/- रुपए
5.18 वर्षांचे झाल्यावर75000/- रुपए

No comments

Powered by Blogger.